9 May 2024 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान? Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
x

Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.98 टक्के वाढीसह 22.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 मार्च 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 9.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2008 नंतर रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 99 टक्क्यांनी घसरले होते. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर आले होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 23.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील काही दिवसांपासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रिलायन्स पॉवर कंपनीने 14 मार्च 2024 रोजी ICICI बँक सोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत, रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीची प्रवर्तक असलेल्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीने आर्थिक प्रक्रियेसाठी कॉर्पोरेट हमीदार बनण्यास सहमती दर्शवली आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 24.49 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 75.51 टक्के भाग भांडवल धारण केले होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे प्रवर्तक अनिल अंबानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,65,792 शेअर्स आहेत. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे रिलायन्स पॉवर कंपनीचे 93,01,04,490 शेअर्स आहे. हे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 24.40 टक्के हिस्सा आहे. अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांनी देखील रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,12,708 शेअर्स होल्ड केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 18 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x