
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्क्यांच्या वाढीसह 378 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील आठवड्याच्या शेवटी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला आणखी एक ऑर्डर मिळाली आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी अंश )
मागील 7 दिवसात या सरकारी कंपनीला 3 मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे अवघ्या 3 दिवसांत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले आहेत. 13 मार्च 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 308.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स 378 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 350.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीला बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत बीएमसीच्या आरोग्य विभागासाठी HMIS चा पुरवठा, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग, कमिशनिंग, ऑपरेशन्स आणि मेंटेनन्सची कामे करणे अपेक्षित आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 351.95 कोटी रुपये आहे.
मागील आठवड्यात शनिवारी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला 130 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. बिहार शिक्षण प्रकल्प परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांने ही ऑर्डर दिली आहे. 4 मार्च 2024 आणि 14 मार्च 2024 रोजी ओरिसा राज्यातून रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला दोन मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डर्सचे मूल्य अनुक्रमे 87 कोटी रुपये आणि 114 कोटी रुपये आहे. मार्च 2024 या महिन्यात देखील कंपनीला एक ऑर्डर मिळाली आहे.
मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 102.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 मार्च 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 378 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे.
18 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 216.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 मार्च 2024 रोजी हा स्टॉक 378 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 491.15 रुपये होती. तर शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 96.20 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.