21 May 2024 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

BSE Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 38 टक्के परतावा, दिग्गज ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

BSE Share Price

BSE Share Price | बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीसह वाढत होते. तर आज मात्र या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 2215 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 फेब्रुवारी 2024 रोजी बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2,598.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पाळतीवर ट्रेड करत होते. ( बीएसई लिमिटेड कंपनी अंश )

मार्च 2023 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने 406.20 रुपये ही आपली नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के घसरणीसह 2,214 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्म Investec ने बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2800 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमधील क्लोजिंग किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 38 टक्के अधिक वाढू शकतो.

Investec फर्मने 6 फेब्रुवारी 2024 रोजी बीएसई लिमिटेड कंपनीच्या स्टॉकला ‘होल्ड’ रेटिंग दिली होती. आणि शेअर्सची टार्गेट प्राइस 2345 रुपयेवरून 2800 रुपये केली होती. इन्वेस्टेक फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, बीएसई निर्देशांकात इक्विटी डेरिवेटिव वॉल्यूममध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, BANKEX मधील तेजीमुळे बीएसई कंपनीची शेअर बाजारातील हिस्सेदारी आणखी वाढेल.

बीएसई लिमिटेड कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला दिल्या जाणाऱ्या समाशोधन शुल्कावर प्रति 10 लाखावर 30 टक्के शुल्क कमी करण्यात यश मिळवले आहे. शेअर बाजारातील 5 दिग्गज ब्रोकरेज फर्मने बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदीचा सल्ला दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म HDFC रिसर्चने बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर सर्वाधिक म्हणजेच 3050 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BSE Share Price NSE BSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

BSE Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x