13 December 2024 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव घसरला, पटापट 24 कॅरेट ते 14 कॅरेट सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | इस्रायल-इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट ते 14 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम घसरला आहे. तर आज चांदीही 313 रुपयांनी घसरून 83506 रुपये प्रति किलो झाली.

आज सराफा बाजारात कोणत्या कॅरेट सोन्याचा भाव किती आहे?
आयबीजेएच्या ताज्या दरानुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 रुपयांनी कमी होऊन 72732 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.. तर आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 440 रुपयांनी कमी होऊन 72441 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 403 रुपयांनी कमी होऊन 66623 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 332 रुपयांनी घसरून 54549 रुपये झाला आहे. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 259 रुपयांनी घसरून 42548 रुपये झाला आहे.

3 वर्षात सोन्याच्या दरात 27813 रुपयांची वाढ
1 एप्रिल 2021 रोजी सराफा मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 44919 रुपयांवर बंद झाला होता. तीन वर्षांत सोने प्रति 10 ग्रॅम 27813 रुपयांनी महागले. दुसरीकडे, चांदी या तीन वर्षांत 63737 रुपये प्रति किलोवरून 18307 रुपयांनी वाढून 83506 रुपये झाली आहे.

अशी होती मार्च-एप्रिलमध्ये सोन्याची वर्दळ
* 28 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 67252 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
* 1 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 68964 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता.
* 3 एप्रिल रोजी तो पुन्हा 69526 च्या नव्या शिखरावर पोहोचला.
* 4 एप्रिल रोजी 69936 चा उच्चांक गाठला.
* 8 एप्रिल रोजी सोने 71279 रुपयांवर पोहोचले होते.
* 9 एप्रिल रोजी तो 71507 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला.
* 12 एप्रिलरोजी तो 73174 रुपयांवर पोहोचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details 15 April 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x