9 May 2024 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Suzlon Share Price | 37 रुपयाच्या सुझलॉन शेअरचा सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस तज्ज्ञांकडून जाहीर, कोणते संकेत दिले?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. तर शुक्रवारी देखील स्टॉकमध्ये खरेदी पाहायला मिळाली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.48 टक्क्यांच्या वाढीसह 37.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के वाढीसह 37.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स अवघ्या एक वर्षात तब्बल 376 टक्क्यांनी मजबूत झाले होते. मात्र, 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉकने फारशी सकारात्मक कामगिरी केली नाहीये.

शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना सुझलॉन एनर्जी स्टॉक 40-42 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र गुंतवणूक करताना तज्ञांनी 36 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची देखील शिफारस केली आहे. 36 रुपये ही सुझलॉन एनर्जी स्टॉकमधील सपोर्ट प्राइस आहे. या किमतीच्या वर हा स्टॉक 40-42 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र जर स्टॉक 36 रुपयेच्या खाली घसरला तर विक्रीचा दबाव आणखी वाढू शकतो.

सुझलॉन एनर्जी कंपनीने डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत 203.04 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने डिसेंबर तिमाहीत 78.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच वार्षिक आधारे या कंपनीच्या शेअर्समध्ये 160 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या महसूल संकलनात 7.17 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 1552.91 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो मागील वर्षी याच तिमाहीत 1,448.97 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 23 march 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x