30 June 2022 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

केंद्राच्या धोरणांवर टीका | न्युजक्लीक आणि न्युजलॉंड्री डिजिटल पोर्टलच्या कार्यालयांवर ED नंतर इन्कम टॅक्सची धाड

Income tax

नवी दिल्ली, १० सप्टेंबर | हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या ऑफिसवर फेब्रुवारी महिन्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला होता. अभिसार शर्मा सध्या newsclick.in नावाची वेबसाईट चालवतात. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच अनेक शोध पत्रकारितेतून त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचं वास्तव उघड केलं आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर न्युज पोर्टल्स मोदी सरकाविरोधात स्पष्ट बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शर्मा यांच्या कार्यालयावर छापा पडल्याचं म्हटलं गेलं. अनेक पत्रकारांनी या कारवाईनंतर निषेध नोंदवला होता.

केंद्राच्या धोरणांवर टीका, न्युजक्लीक आणि न्युजलॉंड्री डिजिटल पोर्टलच्या कार्यालयांवर इन्कम टॅक्सची धाड – Income tax raided on NewsClick digital news portal office in Delhi :

अभिसार शर्मा यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून छाप्याची माहिती दिली होती. ईडीने केवळ न्यूज क्लिकच्या ऑफिसवरच नव्हे तर, गुंतवणुकदारांच्या कार्यालयांवरही छापे टाकले असल्याचे शर्मा यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले होते.

आता त्यांच्या पुढचा अंक देखील सुरु झाला आहे. आगामी उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर केंद्रीय यंत्रणा सज्ज झाल्या असून केंद्र सरकारला अडचणीत आणणाऱ्या वृत्त वाहिन्या आणि न्युज पोर्टल्स रडारवर आल्याचं म्हटलं जातंय. त्याचाच भाग भाग म्हणजे आता NewsClick आणि NewsLaundry या न्युज पोर्टल्सच्या दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागाची धाड पडल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्र सरकारविरोधात माध्यमांची दार अधिक तीव्र होईल असं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Income tax raided on NewsClick digital news portal office in Delhi.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x