
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात शानदार कामगिरी केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या एका वर्षात 200 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. एसजेव्हीएन ही कंपनी अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )
मागील 4 वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सची किंमत 20.75 रुपयेवरून वाढून 123 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात एसजेव्हीएन कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 490 टक्के नफा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 1.57 टक्के वाढीसह 122.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
जर तुम्ही मार्च 2023 मध्ये एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.9 लाख रुपये झाले असते. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह 120.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मात्र काही वेळातच हा स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 123.15 रुपये किमतीवर पोहोचला होता. एसजेव्हीएन कंपनी आपल्या उपकंपन्यासह अक्षय ऊर्जा निर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीचा व्यवसाय भूतान आणि नेपाळमध्येही विस्तारला आहे. एसजेव्हीएन कंपनी मुख्यतः थर्मल पॉवर, हायड्रो पॉवर, सोलर पॉवर आणि पॉवर ट्रान्समिशन संबंधित व्यवसाय करते.
मागील एका वर्षात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 290 टक्के परतावा कमावून दिला आहे. यावर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 34.50 टक्के मजबूत झाले आहेत. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये एसजेव्हीएन स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. मार्च महिन्यात SJVN Limited कंपनीचे शेअर्स फक्त 1 टक्के वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.