15 December 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

Global Surfaces IPO | खुशखबर! नवीन IPO लाँच होतोय, गुंतवणुकीची सुवर्ण संधी, IPO डिटेल्स वाचून पैसे तयार ठेवा

Global Surfaces IPO

Global Surfaces IPO | सध्या जे तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्हाला कमाई करण्याची एक सुवर्ण संधी मिळणार आहे. पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘ग्लोबल सरफेस’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 13 मार्च 2023 ते 15 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. सोमवारपासून तुम्ही ‘ग्लोबल सरफेस’ कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओद्वारे 155 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची तयारी करत आहे. ‘ग्लोबल सरफेस’ कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत 133 ते 140 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या कंपनीचे शेअर बीएसई आणि एनएसई एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जातील.

IPO चा आकार :
ग्लोबल सरफेस कंपनीच्या IPO चा आकार 155 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. कंपनी या IPO मध्ये 8,520,000 फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. तर 2,550,000 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जातील. ‘ग्लोबल सरफेस’ या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचे प्रवर्तक मयंक शाह आणि श्वेता शाह ऑफर फॉर सेलद्वारे आपल्या शेअर्सची विक्री खुल्या बाजारात करणार आहेत.

राखीव कोटा :
ग्लोबल सर्फेस कंपनीच्या IPO अंतर्गत, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. 50 टक्के कोटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असेल, तर 15 टक्के कोटा गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला जाईल.

किमान गुंतवणूक :
‘ग्लोबल सरफेस’ कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 100 शेअर्स जारी केले जातील. यासाठी गुंतवणुकदारांना किमान 14,000 रुपये जमा करावे लागतील. गुंतवणुकदार 14 लॉटसाठी बोली लावू शकतात. म्हणजेच 14 लॉट साठी गुंतवणुकदारांना 196,000 रुपये जमा करावे लागतील.

IPO संबंधित महत्वाची तारीख :
* IPO उघडण्याची तारीख : 13 मार्च 2023
* IPO बंद तारीख : 15 मार्च 2023
* शेअर वाटप : 20 मार्च 2023
* शेअर वाटप पूर्ण : 21 मार्च 2023
* डिमॅट खात्यावर स्टॉक क्रेडिट : 22 मार्च 2023
* IPO स्टॉक लिस्टिंग : 23 मार्च 2023

IPO निधीचा वापर :
‘ग्लोबल सरफेस’ कंपनी आपल्या IPO द्वारे उभारलेली रक्कम दुबईमध्ये उत्पादन सुविधा केंद्र उभारण्यासाठी आणि तिच्या ग्लोबल सरफेसेस FZE साठी खर्च करणार आहे. तसेच उर्वरित रक्कम कंपनी सामान्य कॉर्पोरेट व्यवहारांसाठी खर्च करणार आहे. 2021-22 मध्ये कंपनीने 198 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीच्या निव्वळ नफा 35 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Global Surfaces IPO is ready to launch for investment check details on 11 March 2023.

हॅशटॅग्स

#Global Surfaces IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x