15 December 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Adani Port Share Price | ब्रेकआऊटचे संकेत! तज्ज्ञांकडून अदानी पोर्ट्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स 24 जून 2024 पासून सेन्सेक्स इंडेक्समध्ये सामील केले जाणार आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स सेन्सेक्स इंडेक्समध्ये विप्रो कंपनीच्या शेअर्सची जागा घेतील. शुक्रवारी सेबीने याबाबत अधिकृत घोषणा केली होती.

IIFL अल्टरनेटिव्ह रिसर्च फर्मने या घोषणेपूर्वी आपल्या एका अहवालात अंदाज वर्तवला होता की, विप्रो स्टॉक सेन्सेक्समधून बाहेर पडल्यानंतर त्यातून जवळपास 500 कोटी रुपये गुंतवणुकीचे निर्गमन होऊ शकते. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1.83 टक्के घसरणीसह 1,416.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अदानी पोर्ट्स स्टॉक सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी शेअर बाजारातील सेन्सेक्स निर्देशांकामध्ये सामील केले जातील. यासह टाटा समूहाचा भाग असलेली ट्रेंट लिमिटेड कंपनी सेन्सेक्स-50 इंडेक्समध्ये सामील केली जाणार आहे. ट्रेंट कंपनी Divi’s Laboratories Limited या कंपनीच्या शेअर्सची जागा घेणार आहे.

त्याचप्रमाणे पेज इंडस्ट्रीज, एसबीआय कार्ड्स, आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स, ज्युबिलंट फूडवर्क्स, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस या कंपन्यांचे शेअर्स S&P BSE-100 इंडेक्समधून वगळले जाणार आहेत. आणि त्यांच्या जागी REC Ltd, HDFC AMC, कॅनरा बँक, कमिन्स इंडिया, पंजाब नॅशनल बँक हे शेअर्स सामील केले जाणार आहे.

AU स्मॉल फायनान्स बँक, IDFC फर्स्ट बँक हे शेअर्स 24 जून 2024 पासून BSE Bankex निर्देशांकाचा भाग राहणार नाही. त्यांच्या जागी येस बँक, आणि कॅनरा बँकचे शेअर्स सामील केले जातील. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स स्टॉक 4.22 टक्क्यांच्या घसरणीसह 1,382.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, अदानी पोर्ट्स स्टॉक पुढील काळात 1,550 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1,400 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, अदानी पोर्ट्स स्टॉकची एका महिन्याची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 1,350 रुपये ते 1,500 रुपये दरम्यान असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 25 May 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x