
Cochin Shipyard Share Price | गेल्या वर्षभरात कोचीन शिपयार्डच्या शेअर्सच्या किमतीत तुफानी वाढ झाली आहे. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 298 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.59 टक्क्यांनी वधारून 901.65 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
गेल्या 3 महिन्यांत या मल्टीबॅगर शेअरच्या किंमतीत 39 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिने शेअर्स ठेवले आहेत, त्यांना आतापर्यंत 80 टक्के वाढ झाली आहे. अशा वेळी कोचीन शिपयार्डवर पैसे गुंतवणे योग्य निर्णय ठरेल की नाही?
काय म्हणतात तज्ज्ञ
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने कोचीन शिपयार्डला ‘बाय’ टॅग दिला आहे. तज्ज्ञांनी 1055 रुपये उद्दिष्ट ठेवले आहे. ही टार्गेट प्राइस ठरवण्यामागे ब्रोकरेजने 2 कारणे दिली आहेत. पहिलं कारण म्हणजे जहाजबांधणीची क्षमता आणि जहाज दुरुस्ती आणि दुसरं कारण म्हणजे चांगल्या ऑर्डरची निवड.
या वर्षी शेअर्सची विभागणी करण्यात आली
कंपनीच्या शेअर्सचे नुकतेच विभाजन करण्यात आले आहे. 10 जानेवारी 2024 रोजी कंपनीच्या शेअर्सनी बीएसईमध्ये एक्स-स्प्लिट ट्रेड केला आहे. मग कंपनीने एका शेअरची 2 भागांत विभागणी केली. तर 12 फेब्रुवारी ला कंपनीने शेअर बाजारात शेवटचा एक्स डिव्हिडंड ट्रेड केला. त्यानंतर कंपनीने प्रति शेअर 3.50 रुपये लाभांश दिला.
शेअर बाजारात कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 944.65 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 205 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचे मार्केट कॅप 23,720.68 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.