12 December 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सध्या सलग ३ दिवस सुट्ट्या आल्या आहेत. मात्र सोन्याच्या भाव वाढीला कोणतीही सुट्टी नसल्याचे पाहायला मिळतेय. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.

सध्या सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 66268 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर सोमवारी सोन्याचा भाव 65612 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवड्यात तो 656 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह बंद झाला.

सध्या सराफा बाजारात चांदीचा भाव किती?
तर चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. शुक्रवारी चांदीचा भाव 74052 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर चांदीचा भाव सोमवारी 74156 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे आठवडय़ात चांदीच्या दरात किलोमागे 104 रुपयांची घसरण झाली.

सध्या सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 646 रुपये प्रति 10 ग्रॅम ने स्वस्त आहे. सोन्याने 21 मार्च 2024 रोजी उच्चांकी पातळी गाठली. त्या दिवशी सोने 66914 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत गेले होते. तर चांदी 2882 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आता जाणून घ्या कॅरेटनुसार गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत किती बदल झाला.

सध्या 10 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 38767 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 384 रुपयांनी वधारला.

सध्या 14 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर 49701 रुपये आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 493 रुपयांनी वधारून बंद झाला.

सध्या 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 18 कॅरेट म्हणजेच ७५.० टक्के शुद्ध सोन्याचा दर 60702 रुपयांच्या पातळीवर आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 602 रुपयांनी वधारून बंद झाला.

सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 66003 रुपये आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 653 रुपयांनी वधारला.

सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 66268 रुपयांच्या पातळीवर आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 656 रुपयांनी वधारून बंद झाला.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details 25 March 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x