19 May 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

HAL Share Price | भरवशाचा HAL शेअर भरघोस परतावा देईल, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. नुकताच गयाना देशाच्या सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा एक ऑर्डर दिली आहे, त्यामळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

26 मार्च 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कंपनीला या गयाना देशाच्या सरकारने 194 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर दिली आहे. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 3,278 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी गयाना देशाला 2 हिंदुस्तान-228 प्रकारचे प्रवासी विमाने बनवून देणार आहे. याशिवाय, ही कंपनी सुटे भाग आणि विमान हाताळण्यासाठी लागणाऱ्या सेवा प्रदान करणार आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3194.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर इंट्रा-डे मध्ये स्टॉकची किंमत 3260.70 रुपये किमतीवर पोहोचली होती.

मागील आठवड्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाने 2890 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 80,000 कोटी रुपये होता. ब्रोकरेज फर्म यूबीएसच्या मते, कंपनीच्या ऑर्डर्स बूकचा आकार आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 2.4 लाख कोटी रुपयेवर जाईल.

मागील एका वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 147 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 67.80 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्रोकिंग फर्म यूबीएसच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3600 रुपये किमतीवर जाऊ शकतात. या कंपनीमधील 71.6 टक्के वाटा भारत सरकारने धारण केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 27 March 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x