
HEG Share Price | मागील काही वर्षात एचईजी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 365 टक्के वाढवले आहे. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 या कालावधीत एचईजी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. ( एचईजी लिमिटेड कंपनी अंश )
मात्र त्यानंतर कंपनीचे शेअर्स पुन्हा वाढू लागले. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी एचईजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के घसरणीसह 1,876.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मार्च 2020 मध्ये एचईजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 409 रुपये किमतीवर पोहचले होते. आता या कंपनीचे शेअर्स 1876 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 365 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीची स्थापना 1977 साली झाली होती. एचईजी लिमिटेड ही कंपनी मुख्यतः आयटी सेवा, वीज निर्मिती, ग्रेफाइट इलेक्ट्रोड आणि कापड संबंधित व्यवसाय करते.
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने एचईजी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ टॅग देऊन गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 2420 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 27.30 टक्के वाढू शकतो. एचईजी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2038 कोटी रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 919 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7340.87 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.