Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, मजबूत टार्गेट प्राइस जाहीर, किती फायदा?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1,000 रुपये किमतीजवळ ट्रेड करत होते. टाटा मोटर्स लिमिटेड स्टॉक मंगळवारच्या व्यवहारात 987.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA ने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर 1,133 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 980.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 15 टक्के वाढण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,27,689.23 कोटी रुपये आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 994.95 रुपये किंमत स्पर्श केली होती. सध्या टाटा मोटर्स स्टॉक 1,065.60 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या जवळ ट्रेड करत आहेत. तर हा स्टॉक 400.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 146.26 टक्के वाढला आहे.
CLSA फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन 1133 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. यूके सोसायटी ऑफ मोटर मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्सच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये यूकेमध्ये नवीन कारची नोंदणी वार्षिक 14 टक्के वाढीसह 84,886 युनिट्स नोंदवली गेली आहे.
2024 च्या पहिल्या दोन महिन्यांत युकेमधे नवीन कारची नोंदणी वार्षिक 10.3 टक्के वाढीसह 227,762 युनिट्स नोंदवली गेली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या लक्झरी ब्रँड जॅग्वार कंपनीने यूकेमध्ये नवीन कारच्या नोंदणीमध्ये 136.54 टक्के मोठी वाढ नोंदवली आहे. लँड रोव्हर विभागाने फेब्रुवारी 2024 मध्ये वाहन नोंदणीत 11.71 टक्के वाढ नोंदवली आहे.
जग्वार आणि लँड रोव्ह कंपनीने त्यांच्या देशांतर्गत बाजारात अनुक्रमे 54.63 टक्के आणि 36.4 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. नुकताच टाटा मोटर्स कंपनीने आपल्या दोन वाहन विभागाचे विलगिकरण करून त्यांना स्वतंत्ररित्या सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 च्या सुरुवातीला टाटा मोटर्स कंपनीने PV आणि EV व्यवसायांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती.
CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स दुहेरी अंकी नफा कमावून देऊ शकतात. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर पुढील काळात 1,170 रुपये ते 1,190 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. शेअरखान आणि केआर चोक्सी फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर अनुक्रमे 1,188 रुपये आणि 1,178 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price NSE Live 28 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा