19 May 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला

IFCI Share Price

IFCI Share Price | आयएफसीआय या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मुख्यतः कोविड नंतरच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ( आयएफसीआय कंपनी अंश )

आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर काल गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी आयएफसीआय स्टॉक 1.49 टक्के घसरणीसह 39.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील चार वर्षांत आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.50 रुपयेवरून वाढून 40.70 रुपये किमतीवर पोहचली होती. मागील एका महिन्यापासून आयएफसीआय कंपनीचे शेअर्स बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत आहेत, कारण संपूर्ण पीएसयु सेगमेंट विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची किंमत 24 रुपयेवरून वाढून 40.70 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 70 टक्के नफा कमावला आहे.

मागील एका वर्षात आयएफसीआय या सरकारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 रुपयेवरून 40.70 रुपये किमतीवर गेली होती. या कालावधीत कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 350 टक्के परतावा कमावला आहे. कोविड नंतरच्या रिबाउंडमुळे आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.50 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 1100 टक्के परतावा कमावला आहे.

आयएफसीआय कंपनीच्या शेअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने 37 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट तयार केला आहे. हा स्टॉक सध्या चार्ट पॅटर्नवर सकारात्मक वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांनी आयएफसीआय कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना 37 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या सरकारी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 45-50 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price NSE Live 29 March 2024.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x