
Adani Power Share Price | अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत 500 मेगावॅट क्षमतेचा 20 वर्षांचा दीर्घकालीन वीज खरेदी करार केला असल्याची माहिती दिली आहे. हा करार कॅप्टिव्ह यूजर्स पॉलिसी अंतर्गत करण्यात आल्याची माहिती कंपनीने आपल्या निवेदनात जाहीर केली. अदानी पॉवर कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, त्यांची उपकंपनी MEL ने या करारावर स्वाक्षरी केली आहे. ( अदानी पॉवर लिमिटेड कंपनी अंश )
MEL कंपनीची एकूण परिचलन क्षमता 2,800 MW आहे. या करारा अंतर्गत MEL कंपनीच्या 2800 MW पैकी 600 मेगावॅट क्षमतेच्या एका युनिटला कॅप्टिव्ह युनिट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 2.99 टक्के वाढीसह 532 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अदानी पॉवर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कॅप्टिव्ह पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला पॉवर प्लांटच्या एकूण क्षमतेच्या प्रमाणात कॅप्टिव्ह युनिटमध्ये 26 टक्के हिस्सेदारी खरेदी करावी लागणार आहे. रिलायन्स कंपनी एमईएल कंपनीचे 5 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करून 50 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या कराराद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीकडून 500 मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीकरता विशेष व्यवस्था करण्याची योजना आखली जाणार आहे. या संदर्भात अदानी पॉवर, महान एनर्जी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या तिन्ही कंपनीने गुंतवणूक करार संपन्न केला आहे.
अदानी पॉवर कंपनीने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत छत्तीसगड मधील रायगड येथे 1,600 मेगावॅट क्षमतेचे रायगड फेज-2 औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याचे नियोजित आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 4,000 कोटी रुपये आहे. BHEL कंपनीला छत्तीसगडच्या रायगड फेज-2 प्रोजेक्टमध्ये उच्च-तंत्रज्ञान आधारित 2×800 MW क्षमतेच्या प्रकल्पासाठी उपकरणांचा पुरवठा, बांधकाम आणि ऑपरेशनच्या देखरेखीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. या व्यवहारादरम्यान कंपनीचे शेअर्स 527 रुपये किमतीवर पोहोचले होते. 6 डिसेंबर 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 589.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.