
Venus Pipes and Tubes Share Price | मागील वर्षी एका शानदार कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लाँच झाला. ही कंपनी विविध क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचा IPO स्टॉक शेअर लिस्टिंग झाल्यापासून गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करतोय, तिचे नाव आहे, ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’. तज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढू शकतात. (Venus Pipes and Tubes Limited)
कंपनीचे तपशील थोडक्यात :
‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’ कंपनीचा IPO मागील वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 326 रुपये निश्चित केली होती. आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.082 टक्के वाढीसह 730.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा शेअर आपल्या आयपीओ किमतीच्या तुलनेत 125 टक्के वाढला आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनी मुख्यतः रासायनिक, अभियांत्रिकी, खते, फार्मास्युटिकल्स, उर्जा, अन्न प्रक्रिया, कागद, तेल आणि वायू यांसारख्या क्षेत्रात व्यापार करते.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ज्ञांच्या मते, ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1000 रुपये किंमत पार करू शकतात. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात सांगितले आहे की, “कंपनीची वाढती निर्यात आणि देशांतर्गत विक्री पाहता पुढील काळात कंपनीची कामगिरी शानदार राहणार आहे. म्हणून तज्ञ या कंपनीच्या स्टॉकवर 1,037 रुपये लक्ष किंमत निश्चित करत असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.