16 May 2024 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

JP Power Share Price | 17 रुपयाचा जेपी पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवतोय, 2 दिवस अप्पर सर्किट, तेजी टिकून राहणार?

JP Power Share Price

JP Power Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात काही कंपन्याच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक स्टॉक तज्ञांच्या नजरेत आला आहे. या कंपनीचे नाव आहे, जेपी पॉवर. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 16.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( जेपी पॉवर कंपनी अंश )

आज या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. एकेकाळी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 137 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र एक वेळ अशी आली होती की हा स्टॉक अक्षरशः 0.50 रुपये किमतीवर पडला होता. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी जेपी पॉवर स्टॉक 4.76 टक्के वाढीसह 17.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जेपी पॉवर म्हणजेच जय प्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स मागील दोन दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5.75 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. या काळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 192 टक्के परतावा कमावला आहे.

मागील पाच वर्षांत जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 663 टक्के वाढली आहे. 22 एप्रिल 2005 रोजी हा स्टॉक 30.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 4 जून 2008 रोजी हा स्टॉक 137.10 रुपये किमतीवर पोहोचला होता. त्यानंतर या स्टॉकमध्ये घसरणीला सुरुवात झाली आणि शेअर 5 एप्रिल 2019 रोजी 2.20 रुपये किमतीवर आले होते.

जेपी ग्रुप कंपनीचे शेअर्स 137 रुपये किमतीवरून घसरुन 50 पैशांवर आले होते. यानंतर स्टॉकचा ट्रेंड बदलला आणि 2023 पर्यंत शेअरची किंमत 8 रुपयेवर आली होती. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने 24 रुपये उच्चांक किंमत देखील स्पर्श केली होती. या कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे जवळपास 24 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या FII ने आपला हिस्सा 4.65 टक्के वाढवून 5.14 टक्क्यांवर नेला आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांनी देखील आपला वाटा 1.44 टक्क्यांवरून वाढवून 1.48 टक्केवर नेला आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 69.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 03 April 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x