20 May 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Reliance Power Share Price | 33 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, यापूर्वी अल्पावधीत 2700 टक्के परतावा दिला

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 31.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2700 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची नीचांक किंमत पातळी 10.30 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.87 टक्के वाढीसह 33.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 28 लाख रुपये झाले असते. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 31.84 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2717 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 205 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 10.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 31.84 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 6 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 19.25 रुपयेवरून वाढून 31 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. 2024 या वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीची प्रवर्तक कंपनी रिलायन्स इन्फ्राने देखील आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील एका वर्षात रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 102 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 3 एप्रिल 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 146.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 296.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 3.29 टक्के वाढीसह 301.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 04 April 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x