
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.83 टक्क्यांच्या वाढीसह 158.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. आयआरईडीए कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 214.80 रुपये होती. ( आयआरईडीए कंपनी अंश )
मागील एका वर्षात या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 126.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.37 टक्के वाढीसह 177.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 180 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना 150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, जर या कंपनीचे शेअर्स 150 रुपये किमतीच्या खाली गेले तर शेअर 126 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. जर हा स्टॉक 180 रुपये किमतीवर गेला तर गुंतवणूकदारांनी एकदा प्रॉफिट बुक करावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
नुकताच आयआरईडीए कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 साठी 24,200 कोटी रुपये कर्ज प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, “गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 24,200 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे”. या कर्जाची उभारणी बाँड, शाश्वत कर्ज साधन, मुदत कर्ज, व्यावसायिक पेपर आणि बाह्य व्यावसायिक कर्जद या माध्यमातून केली जाणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.