12 December 2024 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

Tata Steel Share Price | मालामाल होण्यासाठी टाटा स्टील शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक चार्ट तेजीचे संकेत देतोय?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात टाटा स्टील कंपनी आपल्या मार्च तिमाही कामगिरीचे आकडे घोषित करणार आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. टाटा स्टील कंपनीने आपल्या सर्व अडथळ्यांवर मात केली आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

टाटा स्टील कंपनीचा भाग असलेल्या नीलांचल इस्पात निगम लिमिटेड कंपनीने आपली आतपर्यंतची सर्वाधिक स्टील उत्पादन क्षमता गाठली आहे. या कंपनीची वार्षिक स्टील उत्पादन क्षमता 4 टक्के वाढीसह 20.8 दशलक्ष टन वर पोहचली आहे. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.77 टक्के वाढीसह 164.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा स्टील कंपनीच्या भारतातील डिलिव्हरीमध्ये वर्ष-दर-वर्ष 6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. भारतात स्टीलच्या वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत वितरणात वार्षिक 9 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 तिमाहीमध्ये टाटा स्टील कंपनीची डिलिव्हरी 11 टक्के आणि YOY आधारे 5 टक्के वाढून 5.41 दशलक्ष टनवर पोहचली आहे.

शेअर बाजारातील तीन दिग्गज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 170-180 रुपये किमतीवर जाऊ शकतात. जेपी मॉर्गनने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 170 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि ऍक्सिस सिक्युरिटीज फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर 177 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

टाटा स्टील कंपनीच्या नेदरलँड्स स्थित शाखेने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 4.80 दशलक्ष टन एवढे विक्रमी स्टील उत्पादन केले आहे. यासह कंपनीचे स्टील वितरण 5.30 दशलक्ष टन नोंदवले गेले होते. मार्च 2024 तिमाहीमध्ये कंपनीची स्टील उत्पादन आणि वितरण क्षमता तिमाही दर तिमाही आधारावर सुधारले अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे.

टाटा स्टील कंपनीच्या यूके स्थित शाखेने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3.02 दशलक्ष टन लिक्विड स्टीलचे उत्पादन केले होते. आणि 2.80 दशलक्ष टन स्टील वितरण केले होते. ऑटोमोटिव्ह आणि विशेष उत्पादन विभागातील टाटा स्टील कंपनीची डिलिव्हरी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वार्षिक आधारावर 8 टक्के वाढीस 2.9 MT वर गेली आहे. ऑटोमोटिव्ह OEM ला हॉट-रोल्ड आणि कोल्ड-रोल्ड स्टीलच्या उच्च वितरणामुळे व्हॉल्यूममध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ब्रँडेड स्टील उत्पादने आणि किरकोळ विभागातील डिलिव्हरी 11 टक्के वाढीसह 6.5 दशलक्ष टनवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 08 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x