
Servotech Share Price | सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी फोकसमध्ये आले होते. 8 एप्रिल 2024 रोजी सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपले 30 लाख वॉरंट्स इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. ( सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )
सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमशे माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने जानेवारी 2024 मध्ये जारी केलेल्या वॉरंटच्या बदल्यात मिनर्व्हा व्हेंचर फंड आणि फोर्ब्स ईएमएफला इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे. मिनर्व्हा व्हेंचर्स फंड आणि मॉरिशस-आधारित फोर्ब्स EMF यांना प्रत्येकी 15 लाख शेअर्स जारी करण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के वाढीसह 92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 91.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. सर्वोटक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 320 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3,521 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 108.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 21.78 रुपये होती. सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,979.25 कोटी रुपये होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 112 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.