18 May 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर, आता मोठी अपडेट आली

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह 163.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( टाटा स्टील कंपनी अंश )

टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 169.75 रुपये होती. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,04,104.29 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.08 टक्के घसरणीसह 160.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर 170 रुपये टार्गेट प्राइससाठी ‘एक्युम्युलेट’ कॉल जाहीर केला आहे. जेफरीज फर्मने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ कॉल देऊन 200 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. यूएस आणि चीनसह जागतिक उत्पादक व्यवसायातील पुनरुज्जीवनानंतर जेफरीज फर्मने भारतीय धातू कंपन्यांबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर 167-177 रुपये किमतीसाठी ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. रेलिगेअर फर्मने टाटा स्टील स्टॉकवर 177 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

मागील 1 वर्षात टाटा स्टील स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 51.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 92 टक्के वाढली आहे. तर मागील 5 वर्षात टाटा स्टील स्टॉक 206 टक्के मजबूत झाला आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 169.75 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 104.10 रुपये होती.

नुकताच टाटा स्टील कंपनीला भारतीय रेल्वेकडून 333.48 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 333.48 कोटी रुपये आहे. या ऑर्डर अंतर्गत टाटा स्टील कंपनीला 52,753 मेट्रिक टन स्टीलचा पुरवठा करायचा आहे.

या स्टीलचा वापर रेल्वे वॅगन, फूट ओव्हर ब्रिज, डबे बनवण्यासाठी केला जाणार आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीला देखील भारतीय रेल्वेने 891.17 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. आणि जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनीला भारतीय रेल्वेने 105.06 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 15 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x