
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 3677 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.05 टक्के वाढीसह 3637.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
नुकताच एचएएल कंपनीला 65000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने एचएएल कंपनीला भारतात उत्पादित होणारे 97 LCA मार्क 1A लढाऊ विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 65000 कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे. सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी एचएएल स्टॉक 0.63 टक्के वाढीसह 3,660.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
एचएएल कंपनीला स्वदेशी लष्करी हार्डवेअरसाठी केंद्र सरकारने दिलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. या ऑर्डरमुळे भारतीय हवाई दलाला मिग-21, मिग-23 आणि मिग-27 ताफा बदलून नवीन विमाने सामील करण्यास मदत होईल. मागील एका महिन्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 11.34 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 158.8 टक्के नफा कमावून दिला आहे.
एचएएल कंपनी मुख्यतः विमान, हेलिकॉप्टर एरो-इंजिन, एव्हीओनिक्स, ॲक्सेसरीज आणि एरोस्पेस स्ट्रक्चर्ससह विस्तृत उत्पादनांच्या डिझाइन, विकास, उत्पादन, दुरुस्ती, ओव्हरहॉल, अपग्रेड आणि सर्व्हिसिंग यासारख्या व्यवसायात गुंतलेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा ऑर्डर प्रवाह आणि ऑर्डर्सची पूर्तता करण्याच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळाली आहे. ही कंपनी भारताच्या हवाई दलाचे सामर्थ्य आणि आधुनिकीकरण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रभुदास लिलाधर फर्मने एचएएल स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.