
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज, नॅपबुक्स आणि शुक्र फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्यांनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
शुक्र फार्मास्युटिकल्स ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी शुक्र फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 319.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
12 एप्रिल रोजी शुक्र फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 326 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 388 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 54.60 रुपये होती. या नीचांक किंमत पातळीवरून हा स्टॉक 497.07 टक्के मजबूत झाला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 169 टक्के परतावा कमावून दिला आहे.
शुक्र फार्मास्युटिकल्स कंपनीच्या प्रवर्तकांनी या कंपनीचे 50.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर 49.04 टक्के भागभांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 356.87 कोटी रुपये आहे.
इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज कंपनीने देखील आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 16 एप्रिल हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. रेकॉर्ड तारखेला ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 1 इक्विटी शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 677 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 54.46 रुपये आहे. या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत शेअरची किंमत 1053.14 टक्के वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 336.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ॲडव्हर्टाइजमेंट बुक्स कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर कन्सल्टिंग फर्म नॅपबुक्स कंपनीने देखील आपल्या गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. नॅपबुक्स कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी शुक्रवार दिनांक 19 एप्रिल, 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 272 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 71 रुपये आहे. 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत पातळीच्या तुलनेत हा स्टॉक 277.04 टक्के मजबूत झाला आहे. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.72 टक्के वाढीसह 275 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.