
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या कंपनीचे निकाल संमिश्र असे आले आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
तिमाही निकालानंतर अनेक ब्रोकरेज हाऊसने टीसीएस स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत टीसीएस कंपनीच्या नफ्यात प्रचंड वाढ झाली आहे. यासह कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 28 रुपये अंतिम लाभांश देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी टीसीएस स्टॉक 1.29 टक्के घसरणीसह 3,890.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Goldman Sachs ने टीसीएस कंपनीचे शेअर्स 4350 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गनने देखील टीसीएस स्टॉकची रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून अपग्रेड करून ‘ओव्हरवेट’ केले आहे. त्यांनी टीसीएस स्टॉकची टारगेट प्राइस 4000 रुपयेवरून वाढवून 4500 रुपये वाढवली आहे.
जेफरीज फर्मने देखील टीसीएस स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी टीसीएस स्टॉकची टारगेट प्राइस 4000 रुपयेवरून वाढवून 4030 रुपये केली आहे. CLSA फर्मने टीसीएस स्टॉकची रेटिंग अंडरपरफॉर्म केली असून टारगेट प्राइस 4043 रुपयेवरून कमी करून 3941 रुपये केली आहे. मॉर्गन स्टॅन्लेने टीसीएस स्टॉकची टारगेट प्राइस 4350 रुपये निश्चित केली आहे. तर HSBC फर्मने या स्टॉकवर 4540 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे.
नोमुरा फर्मने टीसीएस स्टॉकची टारगेट प्राइस 3250 रुपये निश्चित केली होती. तर सिटी फर्मने टीसीएस स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंगने टीसीएस स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला देऊन 4,100 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. तर मोतीलाल ओसवाल फर्मने टीसीएस स्टॉकवर 4600 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे.
टीसीएस कंपनीचा एकत्रित नफा मार्च तिमाहीत 11058 कोटींवरून वाढून 12434 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 6583 कोटी रुपयेवरून वाढून 61237 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. तर YOY आधारे कंपनीचे महसूल संकलन 3.5 टक्के वाढीसह 61237 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
मार्च तिमाहीत टीसीएस कंपनीच्या भारतीय व्यवसायात 37.9 टक्के वाढ झाली आहे. तर UK स्थित व्यवसायात 6.2 टक्के वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 26.0 टक्के नोंदवले गेले होते. या तिमाहीत टीसीएस कंपनीचा निव्वळ नफा 9.1 टक्के. वाढीसह 12434 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
टीसीएस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मार्च 2024 तिमाहीसाठी शेअर्सच्या दर्शनी मूल्यावर 2800 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे टीसीएस कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 28 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करणार आहे. यापूर्वी कंपनीने 18 रुपये विशेष लाभांश आणि 9 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टीसीएस कंपनीने शेअर बायबॅक आणि लाभांशाच्या रूपात 46223 कोटी रुपये वितरित केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.