 
						Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 371.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने सोमवारी ब्लॅकरॉकसह मालमत्ता व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसाय स्थापित करण्यासाठी 50:50 भागीदारी करून संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे या कंपनीचे शेअर्स मंगळवारी तेजीत आले होते. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 2.37 टक्के वाढीसह 362.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
जिओ फायनान्शिअल कंपनीने आपल्या सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांनी ब्लॅकरॉक सोबत फंड मॅनेजमेंट कंपनी आणि ब्रोकरेज फर्म स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन्ही कंपन्या 50:50 गुंतवणूक करून संयुक्त उपक्रम स्थापन करणार आहेत. हा संयुक्त उपक्रम जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांच्यातील संबंध मजबूत करणार आहे. ब्लॅकरॉक ही अमेरिकन कंपनी जगातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी मानली जाते.
मागील सहा महिन्यांत जिओ कंपनीच्या शेअर्सची किंमत 64 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने सातत्याने सकारात्मक वाढ नोंदवली आहे. या कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 378.70 रुपये होती. नीचांक किंमत पातळी 204.65 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,30,147.72 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकमध्ये 340-350 रुपये किमतीच्या जवळ सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 450 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		