
IRFC Share Price | मागील एका वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 5 पट अधिक वाढवले आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात आले आहेत. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर आणखी वाढू शकतात. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही महिन्यात गुंतवणूकदारांना 55 टक्के नफा कमावून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.55 टक्के वाढीसह 143.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या स्टॉकमध्ये 160 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 160 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 220 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करावा आणि पुढील 8 महिन्यांसाठी होल्ड करावा. याकाळात गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा सहज मिळेल. या कंपनीच्या स्टॉकची मागील एका वर्षातील सर्वोच्च किंमत पातळी 192.8 रुपये होती.
तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकमध्ये तेजी मंदीचे चक्र फिरत आहे. जर हा स्टॉक 100 रुपये किमतीच्या खाली आला तर गुंतवणूकदारांनी तत्काळ आपली गुंतवणुक काढून घ्यावी. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह 141.7 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 415 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 551 टक्क्यांनी वाढवले आहेत. मागील एका आठवड्यात आयआरएफसी स्टॉक 4 टक्क्यांनी कमजोर झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.