
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
आयआरईडीए कंपनीने 2023-24 मधील मार्च तिमाहीत 33 टक्क्यांच्या वाढीसह 337.37 कोटी रुपये नफा कमावला आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात देखील मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 8.28 टक्के वाढीसह 174 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 253.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्क्यांच्या घसरणीसह 160.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 1,391.63 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
मागील वर्षीच्या याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 1,036.31 कोटी महसूल संकलित केला होता. या कालावधीत कंपनीचा खर्च 911.96 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीचा खर्च 747.93 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
मागील 5 महिन्यांत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के मजबूत परतावा कमावून दिला आहे. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत 32 रुपये निश्चित करण्यात आली होती.
मागील एका महिन्यत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे 24.2 टक्क्यांनी वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43,219.26 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.