4 May 2025 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 22 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 25.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 23 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 1.98 टक्क्यांच्या वाढीसह 25.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 दिवसांत या बँकेच्या शेअर्सची किंमत 7 टक्क्यांनी वाढली आहे. ( येस बँक अंश )

लवकरच दुबईस्थित एमिरेट्स एनबीडी बँक येस बँकेचे बहुसंख्य भाग भांडवल खरेदी करणार आहे, अशी बातमी मिळत आहे. यासह जपानस्थित मित्सुबिशी UFJ फायनान्शियल ग्रुप आणि सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन म्हणजेच SMBC देखील येस बँकेत मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2014 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 25.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2020 साली येस बँक आर्थिक संकटात असताना SBI च्या नेतृत्वाखालील संघाने गुंतवणूक करून या बँकेला बुडण्यापासून वाचवले होते. आता हा संघ आपला हिस्सा विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या शोधत आहे. SBI च्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियम येस बँकेचे 51 टक्के भाग भांडवल 35,139 कोटी रुपये मूल्यावर विकणार आहे.

येस बँकेत एसबीआयने सर्वाधिक म्हणजेच 26.13 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय एलआयसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेने 13.84 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

जुलै 2022 मध्ये कार्लाइल गृप आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनल या दोन खाजगी इक्विटी कंपन्यांनी येस बँकेमध्ये गुंतवणूक केली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, येस बँकेला आर्थिक वर्ष 2011-12 ते 2013-14 या मूल्यांकन वर्षासाठी 284.21 कोटी रुपये कर परतावा मिळणार आहे. 284.21 कोटी रुपये कर परताव्यात 113.44 कोटी रुपये व्याजाचाही समावेश आहे.

येस बँकेचे शेअर्स 22 एप्रिल 2024 रोजी 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.21 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 72,523.83 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षभरात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 24 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या