 
						Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत जबरदस्त वाढली आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, अदानी पोर्ट्समध्ये मजबूत रोख प्रवाह आणि मजबूत आर्थिक सुधारणामुळे शेअर गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. अदानी पोर्ट कंपनीने कार्गो व्यवसायाचा खूप मोठा वाटा काबीज केला आहे. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी अदानी पोर्ट स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 1,328.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स 1590 रुपये या टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी आपल्या अहवालात अदानी पोर्ट स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 1338.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्के वाढू शकतात. आर्थिक वर्ष 2024-26 दरम्यान या कंपनीचा रोख प्रवाह 13 टक्के CAGR दराने वाढू शकतो, असा विश्वास डोमेस्टिक ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.
अदानी पोर्ट्स कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 42 कोटी टन मालवाहतूक केली आहे. अदानी पोर्ट ही कंपनी भारतातील सर्वात मोठी खाजगी पोर्ट ऑपरेटर कंपनी आहे. या कंपनीच्या कार्गोमध्ये वर्षभरात 24 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या कंपनीच्या देशांतर्गत बंदरांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 408 दशलक्ष टनपेक्षा जास्त मालाची हाताळणी केल्याची माहिती दिली आहे. अदानी पोर्ट कंपनीने 2014 मध्ये अंदाजे 1.43 कोटी टन मालवाहतूक हाताळली होती. तर मार्च 2024 मध्ये हे प्रमाण 4.28 कोटी टन नोंदवले गेले आहे. म्हणजेच कंपनीच्या माल वाहतुकीत दहा वर्षात तीन पट वाढ झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		