19 May 2024 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला

Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आज अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज या मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करताच शेअर तेजीत आला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 522.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )

या कंपनीचे शेअर्स आज आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची नीचांक किंमत पातळी 45.20 रुपये होती. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 549 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 818.22 टक्के वाढीसह 43.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी मार्च 2023 तिमाहीत या कंपनीन 4.72 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 ला तिमाहीत या कंपनीची विक्री 36.84 टक्के वाढीसह 266.53 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.

एका वर्षापूर्वी याच कालावधीत कंपनीची विक्री 194.78 कोटी रुपये नोंदवली गेली होती. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने 391.54 टक्के वाढीसह 109.76 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीची विक्री 29.16 टक्के वाढीसह 774.55 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.

मागील एका वर्षात पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 1000 टक्के वाढली आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4500 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5500 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 20 वर्षांत पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 200000 टक्के मजबूत झाली आहे.

पिकाडिली ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः साखर, गूळ, बगॅस आणि इथेनॉलचे उत्पादन आणि विक्री व्यवसाय करते. ही कंपनी साखर आणि डिस्टिलरी विभागांत काम करते. तसेच पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी माल्टा मार्शल, व्हिस्लर, धूमकेतू, इंद्री 2023, कॅमिकारा रम, रॉयल हाईलँड आणि गोल्डन विंग्स ब्रँड नावांखाली मद्य बनवते. या कंपनीची स्थापना 1994 साली चंदीगडमध्ये झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Piccadily Agro Share Price NSE Live 24 April 2024.

हॅशटॅग्स

Piccadily Agro Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x