27 May 2024 8:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी स्टॉकने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदाराना मजबूत नफा कमावून दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी अधिक आकर्षक वाटत आहे. म्हणून तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )

मागील एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 412 टक्के मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.78 टक्के वाढीसह 148.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरएफसी ही मिनीरत्न दर्जा असलेली कंपनी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यतः भारतातील रेल्वे प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते. सध्या रेल्वे संबंधित प्रकल्पाच्या विकासावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केल्याने सरकार पुढील काळात रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

आयआरएफसी या सरकारी रेल्वे कंपनीचे शेअर्स 22 एप्रिल रोजी 1.99 टक्क्यांच्या वाढीसह 143.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 192.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 27.85 रुपये होती. आयआरएफसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,87,925.12 कोटी रुपये आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 87 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तर 2024 मध्ये हा स्टॉक आतापर्यंत 43 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 412 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षात आयआरएफसी स्टॉक 541 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 24 April 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x