6 May 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 18,000 कोटी रुपये मूल्याचा FPO ओपन केला होता. हा FPO भारतातील सर्वात मोठा फॉलो-ऑन पब्लिक ऑफर ठरला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचा FPO तिसऱ्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

जागतिक संस्थागत गुंतवणूकदारांनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या एफपीओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. GQG गृप, कॅपिटल ग्रुप आणि फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सने हा टेलिकॉम कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखवली आहे. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 6.25 टक्के घसरणीसह 13.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 14.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या FPO मध्ये संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 1.23 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 1.93 पट सबस्क्राईब झाला आहे.

राजीव जैन यांच्या GQG पार्टनर्स कंपनीने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या अँकर बुकमध्ये 1,350 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची माहिती मिळत आहे. मागील आठवड्यात जवळपास 74 अँकर गुंतवणूकदारांनी व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये 11 रुपये प्रति शेअर किमतीवर 4.91 अब्ज शेअर्स खरेदी करून 5400 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतो. तज्ञांच्या मते, हा स्टॉक संयम राखणाऱ्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. व्होडाफोन आयडिया या कर्जबाजारी दूरसंचार कंपनीने सोमवच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18,000 कोटी रुपयेचा एफपीओ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केली आहे. 48 म्युच्युअल फंड संस्थांनी डिसेंबर 2023 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. 6 नवीन म्युच्युअल फंडांनी मार्च 2024 मध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केला आहे. मात्र तरीही व्होडाफोन आयडिया कंपनीमधील म्युच्युअल फंडांचा वाटा 2.91 टक्केवरून घसरुन 2.06 टक्केवर आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 24 April 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x