
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 64.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर जाऊ शकतात. नुकताच पटेल इंजिनीअरिंग कंपनीने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट इश्यू लाँच केला आहे. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के घसरणीसह 63.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश )
पटेल इंजिनीअरिंग कंपनीने आपल्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट इश्यूची किमान किंमत 59.50 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. पटेल इंजिनीअरिंग कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र संस्थात्मक खरेदीदारांकडून इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून भांडवल उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. ICICI डायरेक्ट आणि हेम सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स पुढील काळात 80 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत 19134 कोटी रुपये होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती. एप्रिल 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 19.50 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
पटेल इंजिनीअरिंग ही मुंबईस्थित कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी जलविद्युत प्रकल्प आणि धरण प्रकल्पांसाठी बोगदे आणि भूमिगत कामांमध्ये एक्स्पर्ट मानली जाते. मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 39.41 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.