14 December 2024 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

MBA चायवालाने फ्रँचायझी फ्रॉड केला नाही, तर त्याने गाढवांना 30 लाखाला चहाची फ्रँचायझी विकली असं का म्हटलं जातंय? कुठून प्रेरणा?

MBA Chaiwala Scam

MBA Chaiwala | आज एमबीए चायवालाला देशात कोणत्याही ओळखीची गरज नाही. देशभरात १०० हून अधिक आउटलेट्स असलेल्या या कंपनीने जवळजवळ प्रत्येक लहान-मोठ्या शहरात स्थान निर्माण केले आहे आणि लोकप्रियता मिळवली आहे. एमबीए चायवालाचा संस्थापक प्रफुल्ल बिलौरेने इतके यश मिळवल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एमबीए चायवालाने फ्रँचायझीसाठी ३० लाखांपर्यंत खर्च येतो अशी माहिती आहे.

प्रसिद्धीच्या पहिल्या टप्य्यात त्याने मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर स्वतःची ‘मोटिव्हेशनल गुरु’ बनून तरुणांना टार्गेट केले. एमबीए चायवालाने २०१४ नंतरचं राजकारणाचं तंत्र अवलंबल्याचं म्हटलं जातंय. समाज माध्यमांवर एमबीए चायवालाने स्वतःच फेल ‘माती मोलाचं’ फ्रँचायझी मॉडेल अनेक तरुणांना ‘चाय पे चर्चा’ करत सोन्याप्रमाणे लाखो रुपयांना विकले. फ्रँचायझी फ्रॉड उघड झाल्यावर समाज माध्यमांवर याची सांगड सध्याच्या देशपातळीवरील राजकारणाशी घातली जातेय.

एमबीए चायवालावर फसवणुकीचा आरोप
त्याच्यावर आणि त्याच्या टीमवर फसवणुकीचा आरोप केला जात आहे. तक्रारी दाखल केल्या जात आहेत. खोटी आश्वासने देऊन त्याने कंपनीच्या फ्रँचायझीसाठी भरपूर पैसे जमा केल्याचे बोलले जात आहे. नंतर व्यवसाय चालला नाही आणि दुकाने बंद झाली. आता या प्रकरणात प्रश्नांनी घेरलेल्या एमबीए चायवाला प्रफुल्ल बिलौरे यांनी न पटणारी स्पष्टीकरण दिली आहेत. अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्यावर तो माध्यमांना आता काय सांगतो आहे? त्यात तो आता लिखित कराराचा आसरा घेऊन हात झटकतोय असं दिसतंय.

तुमच्या कंपनीविरोधात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून तक्रारी आल्या आहेत, काय प्रकरण आहे?
प्रफुल्ल : भारतात आमच्या १२५ फ्रँचायझी आहेत. फक्त तीन ते चार फ्रँचायझींना काही अडचणी आहेत. त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर हे प्रकरण सोडवू. इतर सर्व फ्रँचायझींचा व्यवसाय चांगला सुरू आहे. कुठेही अडचण नाही.

तुम्ही मोठ्या नफ्याची स्वप्ने दाखवली आणि लोकांचे नुकसान झाले, असा आरोप होत आहे.
प्रफुल्ल : बोलण्यावर कुठलाही धंदा चालत नाही. ते कागदावर चालते. जर मी कुणाला माझ्यासोबत बिझनेस करून कोट्यवधी रुपये कमवायला सांगितले तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का? व्यावसायिक व्यवहार गोष्टींवर आधारित नसतात तर नियम आणि कायदे यावर आधारित असतात.

फ्रँचायझी म्हणतात की तुम्ही त्यांचे पैसेही परत करत नाही?
प्रफुल्ल : आम्ही कोणाचेही पैसे ठेवणार नाही. ज्यांना अशी काही अडचण असेल त्यांनी आमच्याशी थेट बोलले पाहिजे किंवा कायदेशीररित्या प्रकरण समजून घ्यावे. कायदा आपलं काम करेल. आम्ही कायदेशीररित्या काहीही चुकीचे करत नाही.

तक्रारींमागचे खरे कारण काय?
प्रफुल्ल : लोक फ्रॅन्चायझी घेतात आणि त्यांना कधी कधी वाटतं की पहिल्या महिन्यापासून लाखो रुपयांचा बिझनेस होईल. कोणताही व्यवसाय असा चालत नाही. धीर धरावा लागेल. कालांतराने हा व्यवसाय वाढत जातो. काही प्रकरणांमध्ये भागीदारांनी फ्रँचायझी घेतली आणि त्यांच्यातील भांडणामुळे व्यवसाय कोलमडला, तेव्हा त्यांनी आम्हाला दोष देण्यास सुरुवात केली. काळाच्या ओघात प्रत्येकाला वास्तव काय आहे हे कळेल.

सोशल मीडियावर तुमच्याविरोधातील तक्रारींचे प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहेत…का?
प्रफुल्ल : सोशल मीडियावर फक्त माझी बदनामी करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट केले जातात. काही लोकांना आमची ब्रँड व्हॅल्यू कमी करायची आहे. याच कारणामुळे हे सर्व षडयंत्र रचून केले जात आहे. जर कोणाला व्यवहार किंवा व्यवसायाशी संबंधित काही समस्या असतील तर आमच्याशी बोला. आपली समस्या सुटत नाही, असे वाटत असेल तर त्यांच्याकडे कायद्याचा आधार घेण्याचा पर्याय आहे. व्हिडिओ टाकल्याने स्पष्ट पणे दिसून येते की समोरच्याचा उद्देश फक्त आमच्या ब्रँड व्हॅल्यूवर हल्ला करणे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MBA Chaiwala Scam Explained check details on 21 May 2023.

हॅशटॅग्स

#MBA Chaiwala Scam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x