15 December 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी

HPCL Share Price

HPCL Share Price | एचपीसीएल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाहीये. ( हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )

एचपीसीएल तिसऱ्यांदा आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. यापूर्वी कंपनीने 2016 मध्ये 2:1 या प्रमाणात आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यासह, कंपनीने 2017 मध्ये देखील 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी एचपीसीएल स्टॉक 0.94 टक्के वाढीसह 518.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 513.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 12 महिन्यांत एचपीसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 594.45 रुपये होती. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 239.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73,895.54 अंकावर क्लोज झाला होता. दिवसभराच्या व्यावहारारम्यान सेन्सेक्स 74,359.69 ते 73,786.29 अंकांच्या दरम्यान ट्रेड करत होता. यासह निफ्टी-50 निर्देशांक सोमवारी 22,442.70 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणुक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HPCL Share Price NSE Live 07 May 2024.

हॅशटॅग्स

HPCL Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x