
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. मार्च तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली आहे. तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर मंगळवारी जयप्रकाश पॉवर कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 5 टक्के वाढीसह 19.99 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )
12 फेब्रुवारी 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 23.99 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर मे 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 5.57 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. 4 जानेवारी 2008 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 137 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मार्च 2020 मध्ये कोरोना महामरित या कंपनीचे शेअर्स 60 पैसेवर आले होते.
मार्च 2023 तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीला 43.99 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर या तिमाहीत कंपनीने एकूण 1863.63 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने 1,385.41 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने 1021.95 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 55.42 कोटी रुपये नफा कमावला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न. 7,151.29 कोटी रुपये नोंदवले गेले होते. तर मागील आर्थिक वर्षात कंपनीने 5,922.15 कोटी रुपये कमाई केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.