26 May 2024 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Multibagger Stocks | या शेअरने फक्त 1 महिन्यात 93 टक्के परतावा दिला, असे शेअर पोर्टफोलीत असल्यास मालामाल होऊ शकता

Multibagger Stocks, TRF industry, Share market, BSE, NSE,,

Multibagger Stocks | शेअर बाजारात अनेक कंपनीचे स्टॉक सुसाट तेजीत ट्रेडिंग आहेत. ह्या तेजीत आलेल्या शेअर्समध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे, किंवा हे शेअर्स दिवसाच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. अश्या स्टॉकला आपण मल्टीबॅगर स्टॉक म्हणून ओळखतो. या मल्टीबॅगर स्टॉकनी आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही काळात भरघोस परतावा कमावून दिला आहे. यातील काही शेअर्स असे आहेत ज्यांनी अल्पावधीतच आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक सविस्तर माहिती बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.ह्या स्टॉकची किंमतही स्थिर असून ती सातत्याने वाढतना दिसत आहे.

कोणता आहे हा शेअर?
आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, तो आहे, टीआरएफ लिमिटेड कंपनीचा. TRF लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने मागील एका महिन्यातच आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. मागील काही महिन्यात आपण शेअर बाजारात अस्थिरता आणि पडझडीचा अनुभव घेतला असेलच, पण त्यानंतर शेअर बाजारात कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. ह्याच वाढीचा परिमाण TRF कंपनीच्या स्टॉकवरही झाला आहे, आणि स्टॉक मध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. हा शेअर सतत हिरव्या चिन्हात ट्रेडिंग करताना दिसत आहे.

एका महिन्यात दिलेला परतावा :
19 ऑगस्ट 2022 रोजी TRF कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 152.50 रुपयेच्या किमतीवर ट्रेड करत होत, आणि दिवसाखेर ह्याच किमतीवर शेअरची क्लोजिंग झाली होती. यानंतर हा स्टॉक अप्पर सर्किट वर ट्रेड करत आहे.16 सप्टेंबर 2022 रोजी, या स्टॉकची ट्रेडिंग 294.90 रुपये किमतीला क्लोज झाली होती. अशा परिस्थितीत या शेअर्सने एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 93.38 टक्केचा मल्टी बॅगर परतावा कमावून दिला आहे.

टाटा स्टील सह असोसिएशन :
टीआरएफ लिमिटेडच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 294.90 रुपये आहे. त्याची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 106.10 रुपये होती. TRF कंपनीचा संबंध टाटा स्टील या भारतातील सर्वात मोठया स्टील कंपनीशी आहे. TRF कंपनीच्या ऑर्डर बुकपैकी 75 टक्के वाटा टाटा स्टीलकडे आहे. यासोबतच टाटा स्टील TRF कंपनीला आर्थिक मदत देखील करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of TRF industry share price return on 19 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x