27 March 2023 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही   Raymond Share Price | रेमंड शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
x

Hot Stocks | फक्त 5 दिवसात 74 टक्क्यांपर्यंत परतावा, हे 5 शेअर्स पैसा वेगाने वाढवत आहेत, स्टॉकची यादी सेव्ह करा

Hot Stocks

Hot Stocks | मागील आठवड्याच्या शेवटच्या तीन ट्रेडिंग दिवसांत शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. आणि पहिल्या दोन दिवसांत जी काही तेजी आली होती, त्या सर्व तेजीचा शेवट झाला. 16 सप्टेंबर रोजी BSE आणि NSE निर्देशांक 1.5 टक्क्यांहून अधिक कमजोरीसह बंद झाले. यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढीची शक्यता, यूएस डॉलरचा वाढता आलेख, कमी होणारे उत्पन्न आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात चढ उतार आणि अस्थिरता असूनही मागील आठवड्यात 5 असे स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 5 दिवसांत 74 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे.

व्हॅलेन्सिया न्युट्रिशियन :
व्हॅलेन्सिया न्युट्रिशियन ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून, तिचे बाजार भांडवल 10.79 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या कंपनीच्या स्टॉक मध्ये 74.05 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा स्टॉक 5 दिवसांपूर्वी 11.10 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता 19.32 रुपयावर गेले आहे. शुक्रवारी हा स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 19.32 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अवघ्या पाच दिवसात ह्या कंपनीच्या शेअर्सनी 74.05 टक्के परताव्यासह आपल्या भागधारकांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.74 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. हा एक पेनी स्टॉक असून अश्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे,खूप धोकादायक असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेतले पाहिजे.

प्राइम फ्रेश :
प्राइम फ्रेश कंपनीच्या स्टॉकनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा शेअर मागील आठवड्यात 115.45 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 186 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना या स्टॉकने काही दिवसातच 61.11 टक्केचा मल्टी बॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 220.01 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात ह्या कंपनीच्या स्टॉकने 61.11 टक्के परतावा मिळवून दिला आहे, जो FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. मागील ट्रेडिंग सेशन मध्ये ह्या सरॉकने 1.11 टक्क्यांची उसळी घेतली आणि, दिवसा अखेर 186 रुपये किमतीवर बंद झाला.

ओलाटेक सोल्यूशन्स :
मागील आठवड्यात भरघोस परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत ओलाटेक कंपनीचा ही समावेश होतो. मागील आठवड्यात या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 60.48 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. ओलाटेक कंपनीचा शेअर 57.95 रुपयांवर ट्रेड करत होता, तो वाढून आता 93 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 21.76 कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे. मागील आठवड्यात ह्या शेअरमध्ये 5.86 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती, आणि दिवसा अखेर स्टॉक 60.48 रुपये किमतीवर बंद झाला होता.

टाटा इन्व्हेस्टमेंट :
टाटा समूहातील टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरमसाठ नफा कमावून दिला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचा स्टॉक 1828.50 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 2763.90 रुपयांवर पोहोचला आहे. या स्टॉक मधून गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसात 51.16 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 13,984.03 कोटी रुपये आहे. हा शेअर मागील आठवड्यात 2.72 टक्क्यांच्या उसळीसह 2763.90 रुपये किमतीवर बंद झाला होता.

फाइन लाइन : फाइन लाईननेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला होता. हा स्टॉक मागील आठवड्यात 46.95 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 69.95 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या स्टॉकमधून गुंतवणूकदारांनी 48.99 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 33.63 कोटी रुपये आहे. मागील शुक्रवारी हा शेअर 12.96 टक्क्यांच्या उसळीसह 69.95 रुपये किमतीवर बंद झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stocks which gave good return in short time check details on 19 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x