
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 3.51 टक्क्यांनी घसरले होते. तर 2 मे रोजी येस बँकेचे शेअर्स 2.87 टक्क्यांच्या घसरणीसह 25.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )
आज या बँकेचे शेअर्स किंचित घसरणीसह व्यवहार करत आहे. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअर्सची किंमत 7 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 15.50 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.16 टक्के घसरणीसह 24.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
येस बँकेच्या शेअर्सबाबत आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या अहवालात तज्ञांनी म्हंटले आहे की, येस बँकेच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील 3.5 वर्षांपासून येस बँक स्टॉकमध्ये मंदी पाहायला मिळत आहे. टेक्निकल चार्टनुसार येस बँक स्टॉक 25 रुपये ते 28 रुपये दरम्यान गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. तज्ञांच्या मते, अपट्रेण्डमध्ये येस बँक स्टॉक 41 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 19 रुपये किमतीवर स्टॉपलॉस सेट करण्याचा सल्ला दिला आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटी फर्मच्या तज्ञांनी येस बँकेचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, येस बँकेचे शेअर्स 20 रुपयेपर्यंत खाली येऊ शकतात. जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत येस बँकेने 451 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत येस बँकेने 202 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील एका वर्षात येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 123 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.