
Vodafone Idea Share Price | गेल्या काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीने आपल्या FPO च्या माध्यमातून 18 हजार कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. याशिवाय BofA ने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग जाहीर केली आहे. मागील एका आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले होते. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी सध्या तरी व्होडाफोन आयडिया स्टॉकपासून दूर राहावे. तज्ञांच्या मते, मार्च 2024 महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या वायरलाइन वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.89 टक्के घसरणीसह 12.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील आठवड्यात BofA ने Vodafone Idea स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स काही दिवसात 14.5 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांच्या मते, टॅरिफ चार्जेसमध्ये वाढ केल्यास व्होडाफोन आयडिया कंपनीला सर्वाधिक फायदा होऊ शकतो. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ARPU मध्ये 5 टक्के आणि EPS मध्ये 12 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीने भांडवल उभारणी केली आहे, त्याचा वापर कंपनी 4G नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यासाठी खर्च करणार आहे. पुढील 2 वर्षांत कंपनी आणखी 15,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या कंपनीने पूर्वीच 25 हजार कोटी रुपये कर्ज उभारण्याची योजना जाहीर केली होती.
मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉक 17 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने 6 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.