
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक नोव्हेंबर 2023 मध्ये 1400 रुपये या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून हा स्टॉक 25 टक्के घसरला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 157.24 कोटी रुपये नफा कमावला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 216.56 कोटी रुपये नफा कमावला होता. म्हणजेच मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 16.2 टक्के घसरण झाली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाली आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 1.21 टक्के घसरणीसह 1,032.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 5 टक्के घसरणीसह 1032.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 42,000 कोटी रुपये होते. तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकचे मूल्यांकन सध्या महाग वाटत आहे. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध राखण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, कंपनीच्या महसूल संकलनात वाढ झाली असली तरी कंपनीचा नफा किंचित कमी झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या मार्च तिमाहीचा निकालासोबत प्रति शेअर 10.05 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे एक्स्पोजर यांत्रिक अभियांत्रिकी सेवांमध्ये अधिक आहे. ही कंपनी एम्बेडेड सॉफ्टवेअरमध्ये अधिक प्रभावी काम करते. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर करून स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला गुंतवणुकदारांना दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात अधिक खाली येऊ शकतो.
अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकबाबत संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. बँक ऑफ अमेरिकाने टाटा टेक्नॉलॉजी शेअर्सवर BUY रेटिंग कायम ठेवली आहे. तर जेपी मॉर्गनने टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकवर लोअर वेटेज रेटिंग दिली आहे. 6 मे रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 3.80 टक्के घसरणीसह 1045.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1400 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1020 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.