
Railtel Share Price | रेलटेल कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. 22 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 114.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रेलटेल कंपनी अंश )
या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 225 टक्के मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.29 टक्के घसरणीसह 364.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
28 फेब्रुवारी 2024 रोजी रेलटेल स्टॉक 491.15 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 24 टक्के घसरले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 375.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,030 कोटी रुपये आहे.
2024 या वर्षात रेलटेल स्टॉक 6.15 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 209 टक्के परतावा कमवून दिला आहे. 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 114.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
रेलटेल स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 40.8 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 0.9 आहे, जो या कालावधीत खूपच कमी अस्थिरता दर्शवतो. रेलटेल स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवसांपेक्षाच्या मूविंग सरासरी किंमत पातळीच्या खाली आणि 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे.
ICICI सिक्युरिटीज फर्मने रेलटेल कंपनीच्या शेअर्सवर 240 रुपये टार्गेट प्रइस निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2025-26 साठी स्टॉकचा EPS अंदाज 3-4 टक्के कमी असेल. याकाळात स्टॉकचा P/E मल्टिपल मूल्य 20x असेल. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 100 दिवसाच्या DEMA आणि 350 दिवसाच्या DEMA झोनच्या आसपासच्या तत्काळ स्विंगचे संकेत मिळत आहेत. ही DEMA पातळी स्टॉकमधील कोणत्याही झटक्याला रोखू शकते, किंवा शेअरला तात्काळ 400-410 रुपये किमतीवर नेऊ शकते.
प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 348 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मात्र गुंतवणुकदारांनी 450-480 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे. Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, रेलटेल स्टॉकमध्ये 350 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 373 रुपयेच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 418 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
रेलटेल कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 3 टक्के वाढीसह 77.53 कोटी रुपये PAT नोंदवला होता. मागील वर्षाच्या याच तिमाही कालावधीत कंपनीचा PAT 75.24 कोटी रुपये होता. मार्च 2023 तिमाहीत या कंपनीने 707.29 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, होता मार्च 2024 मध्ये 852 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
रेलटेल ही कंपनी मिनीरत्न श्रेणी-I दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी संपूर्ण भारतात ऑप्टिक फायबर नेटवर्कची मालकी असलेली सर्वात मोठी सरकारी दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदात्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या सेवा विभागांमध्ये दूरसंचार सेवा आणि प्रकल्प कार्य सेवा यांचा समावेश होतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.