Penny Stocks | या 6 रुपयाच्या शेअरची कमाल, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा, हा स्टॉक नेहमीच फायद्याचा

Penny Stocks | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करून परतावा मिळवण्यासाठी संयम राखणे खुप महत्वाचे आहे. शेअर बाजारात अनेक वेळा स्मॉल कॅप कंपन्या अल्पावधीतच नाही तर दीर्घकाळातही गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा परतावा कमावून देतात. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे,”तान्ला प्लॅटफॉर्म”. तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर एकेकाळी 6.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सध्या हा स्टॉक 744.60 रुपयांवर गेला आहे.
शेअर्सची दीर्घकालीन कामगिरी :
चालू वर्ष 2022 वर्ष गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक राहिले आहे. या वर्षात तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरची किंमत 39 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 2022 या आर्थिक वर्षात तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची किंमत 59.77 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर, तुमची गुंतवणूक 47 टक्के कमी झाली असती. तथापि, मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार सध्या जबरदस्त नफ्यात असतील. मागील 5 वर्षात तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची किंमत 2212 टक्क्यांनी वधारली आहे.
शेअरची किंमत :
26 ऑक्टोबर 2012 रोजी या कंपनीचे शेअर 6.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑक्टोबर 2022 रोजी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 744.60 रुपयांवर किमतीवर पोहोचले होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.20 कोटी रुपयांपर्यंत वाढले असते. म्हणजेच या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा परतावा कमवून दिला आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2096 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 584.50 रुपये होती. ही कंपनी 2007 साली BSE निर्देशांकावर सीचीबध करण्यात आली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Tanla platform share price return on investment on 31 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL