4 May 2025 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार

Wipro Share Price

Wipro Share Price | विप्रो कंपनीचे शेअर्स बुधवारी 461.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा शेअर किंचित घसरला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.41 लाख कोटी रुपये आहे. नुकताच विप्रो कंपनीने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित वित्तीय सेवांसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत करार केला आहे. ( विप्रो कंपनी अंश )

विप्रो कंपनी आपल्या विप्रो जेनएआई इन्वेस्टर इंटेलिजेंस, विप्रो जेनएआई इन्वेस्टर ऑनबोर्डिंग, आणि विप्रो जेनएआई लोन ओरिजिनेशनच्या माध्यमातून आर्थिक व्यावसाय कसे करतात याबाबत आणि इतर वित्तीय सेवा संबधित योजनांची आखणी करणे, आणि आर्थिक तज्ञांना सहाय्य करणे यासंबंधित काम करणार आहे. आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी विप्रो स्टॉक 1.05 टक्के घसरणीसह 458.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 21.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात विप्रो स्टॉक 3.38 टक्के कमजोर झाला आहे. विप्रो स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 39.3 अंकावर आहे. म्हणजेच शेअर ओव्हरबॉट झोनच्या जवळ ट्रेड करत आहे. हा आयटी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 150 दिवस, 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. तर 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवसांच्या मुविंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.

विप्रो कंपनी अत्याधुनिक GenAI तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थ तज्ञांना सखोल बाजार अंतर्दृष्टी आणि गुंतवणूक पर्याय आणि ग्राहकांच्या वर्तनावर अपडेट देण्याचे काम करणार आहे. हे सिस्टम दस्तऐवज प्रमाणीकरणाची वेळ कमी करून आणि गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना जलद प्रतिसाद देऊन ऑनबोर्डिंग आणि कर्ज उत्पत्ती प्रक्रिया सुव्यवस्थित करतील. यासह हा सिस्टम विद्यमान डिजिटल प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण करून आपल्या क्लायंटचे उत्कृष्ट अनुभव सुनिश्चित करणार आहे.

विप्रो कंपनीचा मायक्रोसॉफ्ट समर्थित हा नवीन सिस्टम आर्थिक सल्लागार आणि बँकिंग व्यावसायिकांना अधिक चांगली आणि मोठी बाजारपेठ तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता सेवा प्रदान करणार आहे. कंपनीने नवीन गुंतवणुकदारांना ऑनबोर्ड करण्यासाठी किंवा कर्ज काढण्यासाठी आवश्यक असलेली पावले, कागदोपत्री खर्च करण्यात येणारा वेळ कमी करण्यासाठी हे नवीन सिस्टम तयार केले आहे. विप्रो कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “कंपनी मायक्रोसॉफ्टसोबतचे सहकार्य आणखी मजबूत करण्यास आणि क्लायंटला अत्याधुनिक आणि जलद वित्तीय सेवा सेवा प्रदान करण्यास उत्सुक आहोत”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wipro Share Price NSE Live 09 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या