
Gold Price Today | इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव ५९९७६ रुपये होता, तो आज सकाळी हा दर ५९९६० रुपये होता.
आज सोन्याचा दर किती?
त्यामुळे आज सोन्यात १६ रुपयांची वाढ झाली आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,587 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झालं होतं. त्यामुळे तो मागील व्यवहाराच्या तुलनेत ३८९ रुपये प्रति १० ग्रॅमने वधारून बंद झाला.
याशिवाय चांदीचा भाव आज 73677 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. आज सकाळी हा दर ७३५५९ रुपये किलोने खुला झाला. त्यामुळे सकाळी चांदीच्या दरात ११८ रुपयांनी वाढ झाली आहे. तत्पूर्वी, चांदी हा दर मागील सत्रात 71999 रुपये प्रति किलोग्राम होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात प्रति किलो १६७८ रुपयांची वाढ झाली आहे.
आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा किती खाली आहे सोन्याचे दर
सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरापेक्षा 1,670 रुपयांनी स्वस्तात विकलं जात आहे. याआधी 4 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61646 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता. तर चांदीही 2,787 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. चांदीने 4 मे 2023 रोजी 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
एमसीएक्सवर कोणत्या दरावर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा वायदा व्यवहार 43.00 रुपयांच्या वाढीसह 59,934.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 285.00 रुपयांच्या वाढीसह 73,955.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.