
Tata Motors Share Price | नुकताच टाटा मोटर्स कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर वाढ झाली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा नफा 5,407 कोटी रुपयेवरून वाढून 17,407.2 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचा नफा 7,376 कोटी रुपयेपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.62 टक्के वाढीसह 1,047 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टाटा मोटर्स कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, टाटा मोटर्स कंपनीचे उत्पन्न 13 टक्क्यांच्या वाढीसह 1,19,986 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. याच काळात टाटा मोटर्स कंपनीचे उत्पन्न 1.05 लाख कोटी रुपयेवरून वाढून 1,19,986 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
टाटा मोटर्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 3 रुपये विशेष लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि प्रति शेअर 6 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स कंपनीचा EBITDA मार्जिन 12.1 टक्केवरून वाढून 14.2 टक्केवर गेला आहे.
या कंपनीचा टॅक्स क्रेडिट 621 कोटी रुपयेवरून वाढून 8159 कोटी रुपयेवर पोहचला आहे. J&LR कंपनीचा मार्च तिमाहीतील EBITDA 105.1 कोटी पाउंडवरून 128.1 कोटी पाउंडवर पोहचला आहे. या कंपनीचा EBITDA मार्जिन 14.8 टक्केवरून वाढून 16.3 टक्केवर गेला आहे. या कंपनीचे तिमाही उत्पन्न 710.2 कोटी पाउंडवरून वाढून 786 कोटी पाउंडवर गेले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.