
IPO GMP | नुकताच एनर्जी मिशन मशिनरी IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी फुल्ल सबस्क्राईब झाला होता. या कंपनीचा IPO 9 मे ते 13 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी हा IPO 7 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 41.15 कोटी रुपये आहे. एनर्जी मिशन मशिनरी कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत वाढत आहे. ( एनर्जी मिशन मशिनरी कंपनी अंश )
सध्या हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 140 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. या IPO मध्ये शेअर्सची अप्पर किंमत बँड 138 रुपये होती. म्हणजेच लिस्टिंगच्या दिवशी हा स्टॉक 275 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये शेअर्स वाटप केले जातील, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.
एनर्जी मिशन मशिनरी IPO शेअर्सचे वाटप 14 मे रोजी केले जातील. तर गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. एनर्जी मिशन मशिनरी कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 7.17 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुतवणूकदारांचा राखीव कोटा 10.79 पट सबस्क्राइब झाला होता.
तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 4.90 पट सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 2.51 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 1000 शेअर्स खरेदी करू शकत होते. एक लॉटची किंमत कंपनीने 1.38 लाख रुपये निश्चित केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.