
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 मध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. पॉलीकॅब इंडिया कंपनी मुख्यतः वायर, केबल आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ( पॉलीकॅब इंडिया कंपनी अंश )
पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअर्सने सोमवारी 6468.90 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 953 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी पॉलीकॅब इंडिया स्टॉक 1.50 टक्के घसरणीसह 6,334.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 5 दिवसांत पॉलीकॅब इंडिया स्टॉक 6 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका महिन्यात हा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के आणि मागील एका वर्षात 85 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 3202.30 रुपये होती. तर स्टॉक काल 6468 या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. शेअर बाजारातील तज्ञांनी पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 7,850 रुपये ही नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
कोटक इंस्टीट्युशनल फर्मच्या तज्ञांच्या मते, पॉलीकॅब इंडिया.स्टॉक पुढील काळात 5,905 रुपये किमतीवर येऊ शकतो. मोतीलाल ओसवाल फर्मने नुकताच पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, पोलीकॅब इंडिया स्टॉक 6139 रुपये या मागील टार्गेट प्राइसच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे तज्ञांनी आता स्टॉक टार्गेट प्राइसमध्ये वाढ करून नवीन टार्गेट प्राइस 7,280 रुपये निश्चित केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.